पिंपरी, 16 ऑक्टोबर
हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क मधील वाहतूक व सुरक्षा विषयक समस्या सोडविण्यासाठी तसेच पुढील दहा वर्षांचे नियोजन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची नेमणूक करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सकाळी दिली. आयटी पार्क मधील इन्फोसीस कंपनीमध्ये आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे यांची हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या पदाधिका-यांसोबत बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस उद्योगमंत्री नारायण राणे उपस्थित होते.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
No comments:
Post a Comment