कामशेत खिंडीमध्ये गॅस टँकर उलटला, जिवितहानी नाही
लोणावळा, 2 डिसेंबर
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. चार वर कामशेत खिंडित आज सकाळी सात वाजता एक गॅसचा टँकर रस्त्यात उलटल्याने महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. टँकरमध्ये 17 टन घरगुती वापराचा गॅस होता. सुदैवाने अपघातात गॅस गळती झाली नाही.
वडगाव महामार्ग पोलिसांनी व कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माऊ येथून चाकण्ा येथील एच पी गॅसच्या प्रकल्पाला प्रदीप रोडवेज कंपनीचा टँकर क्र. (जीजे. 16 एक्स 7907) हा 17 टन गॅस घेऊन येत होता. कामशेत खिंड उतरताना जय मल्हार ढाब्याजवळील तीव्र वळणावर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले.
रस्ता दुभाजकाला 50 फुट घासत हा टँकर पुण्याहून मुंबईकडे जाणा-या लेनवर आडवा झाला. प्रथमदर्शनी गॅस लिकेजची शक्यता ध्यानात घेता राष्ट्रीय महामार्गावरील सर्व वाहतूक थांबवून नंतर ती द्रुतगती महामार्गावर वळवण्यात आली. अपघातामध्ये टँकरचा चालक हा जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, कामशेत पोलीस, आयआरबी कंपनीचे देखभाल व दुरुस्ती विभाग प्रमुख्ा पी. के. शिंदे, पिंपरी चिंचवड येथील अग्नीशमन दल, क्रेन दाखल झाल्या. अकरा वाजण्याच्या सुमारास चाकण्ा येथील एच. पी. गॅस कंपनीचे तांत्रिक अभियंत्याचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले.
दहा वाजल्यानंतर पुण्याकडे जाणारी सर्व वाहतूक लोणावळा येथून द्रुतगती महामार्गावर वळवण्यात आली असून मुंबईकडे जाणारी वाहतुक एकेरी मार्गाने सोडण्यात आली आहे. यामुळे मार्गावर कोठेही वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र नव्हते.
http://www.mypimprichinchwad.com/
No comments:
Post a Comment