ग्राहकांच्या उदासीनतेमुळे होतेय प्रचंड फसवणूक - शरद पवार
पिंपरी, 2 नोव्हेंबर
ग्राहकाच्या उदासीन प्रवृत्तीमुळे वस्तू व सेवाची खरेदी विक्री करताना ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. त्यासाठी त्यांच्यामध्ये जागृतीची खरी गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या '80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण' या तत्वाप्रमाणे पक्षाने पुढाकार घेऊन ग्राहक संरक्षण समितीची स्थापना केली. तेंव्हा बाकीच्या गोष्टींकडे लक्ष घालण्यापेक्षा, चांगले काम करणा-या कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घ्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करा, असा सल्ला केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
www.mypimprichinchwad.com
No comments:
Post a Comment