Monday, 10 December 2012

रेशन दुकानदारांचा उद्या लाक्षणिक बंद

रेशन दुकानदारांचा उद्या लाक्षणिक बंद: पिंपरी । दि. ९ (प्रतिनिधी)

विविध मागण्यांसाठी राज्यातील रेशन दुकानदारांनी मंगळवारी (दि. ११) लाक्षणिक बंद पुकारला आहे. रोख सबसिडी नको धान्य व रॉकेल, गॅस हवा, कमिशन व मानधन नको वेतन हवे, अशी या दुकानदारांची प्रमुख मागणी आहे. अखिल महाराष्ट्र रेशन व रॉकेल दुकानदार फेडरेशनने हा निर्णय घेतला आहे.

सर्व कार्डधारकांना साखर, रॉकेल, गॅस सवलतीच्या दरात मिळायला पाहिजे. स्वस्त धान्य दुकानातून १४ जीवनोपयोगी वस्तू व खुल्या बाजारातील धान्य विक्रीची परवानगी मिळायला पाहिजे.या मागण्यांसाठी दुकान बंद ठेवून आपापल्या तहसील कार्यालयासमोर मोर्चा, धरणे आंदोलन, निदर्शने करणार आहेत. मोर्चा व निदर्शने करूनही सरकारने मागण्यावर कोणताही निर्णय घेतला नाही, तर संपूर्ण भारत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment