कामगारांनी धरली गावाकडची वाट पिंपरी - औद्योगिक मंदीच्या झळा दिवसेंदिवस कामगारांना बसत असून, किमान आठ तास काम मिळविण्यासाठी त्यांना झगडावे लागत आहे. काही कंपन्या व लघुउद्योगांनी ब्लॉक क्लोजर व कामगारकपात केली आहे. त्यामुळे अनेक कामगारांना "गड्या आपला गाव बरा...' म्हणत मूळगावाचा रस्ता पकडला आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत लहान-मोठ्या सुमारे हजार कंपन्या आहेत. या ठिकाणी लाखो कामगार रात्रीचा दिवस करून पोटाचा प्रश्न सोडवतात; परंतु जादा कामाच्या माध्यमातून बारा ते पंधरा तास काम करून महागाईच्या काळात जगणे सोपे करणाऱ्या कष्टकरी कामगारांना आता आठ तासापेक्षा जादा काम मिळत नाही. त्यामुळे मंदीच्या या परिणामामुळे अनेकांना गावाचा रस्ता धरावा लागल्याचे टीयूसीसी संलग्न एमआयडीसी कामगार संघटनेचे सरचिटणीस बी. जी. तळेकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment