Tuesday, 8 January 2013

बचत गटांनी लाटले 30 लाखांचे अनुदान

बचत गटांनी लाटले 30 लाखांचे अनुदान पिंपरी - शहरातील बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रत्येकी 30 लाख रुपयांचे अनुदान आणि बॅंक ऑफ बडोदाकडून 50 लाख रुपयांचे कर्ज घेऊन प्रत्यक्षात एकाही महिलेला रोजगार मिळवून न देणाऱ्या चारपैकी दोन बचत गट अखिल संघांना कर्ज थकविल्याप्रकरणी कर्जवसुली न्यायाधीकरणाने रविवारी (ता. 6) जाहीर नोटीस बजावली आहे. त्यामध्ये स्वाधार आणि राजमाता बचत गट अखिल संघांचा समावेश आहे. या दोन्ही बचत गटांच्या अध्यक्षांना 14 जानेवारी रोजी म्हणणे मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश न्यायाधीकरणाने दिले आहेत. 

No comments:

Post a Comment