Thursday, 31 January 2013

"स्थायी'त येण्यासाठी राष्ट्रवादीत होणार रस्सीखेच

"स्थायी'त येण्यासाठी राष्ट्रवादीत होणार रस्सीखेच पिंपरी - स्थायी समितीमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, कॉंग्रेसचे दोन, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाचा (आठवले गट) प्रत्येकी एक असे आठ सदस्य मंगळवारी काढण्यात आलेल्या सोडतीनुसार येत्या एक मार्चपासून निवृत्त होणार आहेत. त्यांच्या रिक्त जागेवर त्याच पक्षाचे नवीन सदस्य येणार आहेत. महापालिकेची सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने इच्छुकांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे चार जागांसाठी पाच गटांमध्ये तीव्र रस्सीखेच होणार आहे. इच्छुक नगरसेवकांनी लगेचच मोर्चेबांधणीसाठी स्थानिक नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. शिवसेना आणि कॉंग्रेसमध्येही गटबाजी असल्याने त्यांच्या जागांसाठीही इच्छुकांमधील चढाओढही रंगणार आहे. 

No comments:

Post a Comment