Saturday, 19 January 2013

गर्भपात करणारे काळेवाडीतले २ डॉक्टर ताब्यात

गर्भपात करणारे काळेवाडीतले
२ डॉक्टर ताब्यात
: पिंपरी। दि. १८ (प्रतिनिधी)

केवळ १२ आठवड्यांपर्यंतच्या गर्भवती महिलेच्या गर्भपाताची मान्यता असताना २४ आठवड्यांच्या गर्भपाताचा प्रयत्न केल्याचा प्रकार रहाटणीतील जीवनज्योती रुग्णालयात उघडकीस आला. याप्रकरणी स्त्रीरोगतज्ज्ञ महिलेसह दोन डॉक्टरांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

डॉ. चंद्रशेखर अन्नदाते (३८, रा. केशवनगर, चिंचवड) आणि डॉ. विद्या अंबटकर (३0, रा. थेरगाव) अशी या दोघांची नावे आहे. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गजानननगर भागात हे रुग्णालय आहे. सिद्धार्थनगरमध्ये राहणारी २0 वर्षीय विवाहिता ११ जानेवारीला रुग्णालयात तपासणीसाठी आली होती. तिचा गर्भ सदोष असल्याचे सोनोग्राफी तपासणीअंती निदान झाले. तिला डॉक्टरांनी गर्भपात आवश्यक असल्याचे सांगितले. हा गर्भ २४ आठवड्यांचा होता. नियमाप्रमाणे रुग्णालयात १२ आठवड्यांपर्यंतच्याच गर्भपाताची परवानगी आहे. त्यामुळे तिला उपचारांसाठी महापालिकेच्या रुग्णालयात पाठविणे आवश्यक होते.

संमतीपत्रही नाही
विशेष म्हणजे अशा उपचारापूर्वी रुग्णाचे संमतीपत्र भरून घेणे आवश्यक असते. ते भरून घेतले नसल्याचे तपासणीदरम्यान आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे एमटीपी कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उपनिरीक्षक एम. पी. सोनवणे तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment