Saturday, 19 January 2013

पुण्यात ३१ मार्चपर्यंत सेट टॉप बॉक्स सक्तीचा

पुण्यात ३१ मार्चपर्यंत सेट टॉप बॉक्स सक्तीचा: मुंबई। दि. १८ (प्रतिनिधी)

चार महानगरांत टीव्हीचे तंत्रज्ञान डिजिटल तंत्राच्या माध्यमातून चालविण्याच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर आता दुसर्‍या टप्प्यात ३८ शहरांतील टीव्ही डिजिटल तंत्राकडे नेण्याचे काम सुरू झाले आहे. यात राज्यांतील नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक या चार शहरांचा समावेश आहे.

अधिक सुस्पष्ट चित्र आणि अन्य सुविधांसाठी डिजिटल तंत्राद्वारे टीव्ही चालविण्यासाठी विविध टप्प्यांत याची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा मानस आहे. दुसर्‍या टप्प्याचे काम ३१ मार्च २0१३ पर्यंत पूर्ण होणार असून, या शहरांतील ग्राहकांना सेट टॉप बॉक्स बसवून घेणे बंधनकारक ठरणार आहे. अन्यथा त्यांच्या टीव्हीवर कोणत्याही वाहिनीचे प्रक्षेपण दिसणार नाही.

No comments:

Post a Comment