Friday, 11 January 2013

१६१ कर्मचारी उद्या रजेवर?

१६१ कर्मचारी उद्या रजेवर?: पिंपरी । दि. ९ (प्रतिनिधी)

सन २0१२ ते १६ च्या वेतन करारासाठी महामंडळाचे प्रशासन ८ टक्के वेतनवाढ देऊन एसटी कर्मचार्‍यांची ४ वर्षे वाया घालू पहात आहे. राज्य शासन आणि महामंडळाच्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शुक्रवारी (दि.११) मुंबई सेंट्रल ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी वल्लभनगर एसटी आगारातील १६१ कर्मचार्‍यांनी सुटीसाठी अर्ज केला आहे. जास्तीत जास्त कामगार या दिवशी सुटीवर असणार असल्याने शुक्रवारी एसटी प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

प्रलंबित वेतनकरार ४0 टक्कय़ांप्रमाणे करावा, टोल टॅक्स रद्द करावा, डिझेलवर सूट मिळावी आणि प्रवासीकर कमी करावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने मुंबईत मोर्चाचे आवाहन केले आहे. राज ठाकरे आणि संघटनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात सहभागी होण्यासाठी वल्लभनगर आगारातील १६१ कर्मचार्‍यांनी रजेचे अर्ज दिले आहेत. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण मोहिते, शहराध्यक्ष अमर गोडसे, सचिव बाबूराव सुतार, संघटक माऊली मलशेट्टी यांसह मोर्चात आगारातील जास्तीत जास्त कामगार सहभागी होणार असल्याने येथील प्रवासी वाहतूक व्यवस्थेवर त्याचा फार मोठा ताण येणार आहे.

No comments:

Post a Comment