उपनगरातील सदनिकाही आता महाग: पुणे। दि. ३१ (प्रतिनिधी)
शहरातील गोंगाट, सदनिकांचे गगनाला भिडलेले दर यामुळे अनेकजण शहरहद्दीलगतच्या नव्याने विकसित होणार्या गावांकडे वळत आहेत. मात्र शहरहद्दीलगतच्या सदनिका व जमीन खरेदीसाठीही आता अधिक मूल्य द्यावे लागणार आहे. रेडीरेकनरच्या दरात शहरांत २0, तर हद्दीलगतच्या गावांत २0 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने गावांतील सदनिकांसाठीही अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
खरेदी-विक्री व्यवहाराच्या मुद्रांक शुल्कासाठी रेडीरेकनरचा आधार घेतला जातो. पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत रेडीरेकनरच्या दरात वीस टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुणे शहरातील २४५ विभागात १0, तर ४२८ विभागात ११ ते २0 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. पिंपरी-चिचंवडमध्ये ११२ विभागांत १0, तर १२९ विभागात ११ ते २0 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
No comments:
Post a Comment