Tuesday, 15 January 2013

अवैध प्रवासी वाहतुकीचे माहेरघर

अवैध प्रवासी वाहतुकीचे माहेरघर पिंपरी - पॅगो रिक्षातून होणारी क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक, बस थांब्यावरूनच मोटारीतून होणारी अवैध प्रवासी वाहतूक, शहरात प्रवेश बंदी असतानाही सहा आसनी रिक्षांचा मोठ्या प्रमाणात वावर, यामुळे निगडीतील टिळक चौक हा अवैध प्रवासी वाहतुकीचे माहेरघर बनला आहे. त्यातच चौकातील अतिक्रमणांनाही महापालिकेचा आशीर्वाद लाभल्याने पादचारी मार्ग असूनही नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे.

No comments:

Post a Comment