भोसरीतील कंपनीस दोन कोटींचा गंडा: पिंपरी । दि. २८ (प्रतिनिधी)
मालाची परस्परविक्री करून, तसेच ट्रॅव्हल्स कंपनीला भाड्यापोटी अधिक रकमेचा धनादेश देऊन कंपनीची सुमारे दोन कोटींची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अविकल श्रीनिवास सागर (रा. ग्रीन रेसिडेन्सी, विश्रांतवाडी), स्वानंद घुले, संतोष घुले (दोघेही रा. नवी सांगवी), भास्कर रक्षित (रा. चिंचवड), प्रदीप होडपिल्ले (रा. धानोरी, विश्रांतवाडी), स्टॅनली जॉन (रा. बोपोडी) अशी आरोपींची नावे आहेत. डॉ. सुभाष चेरलयतपकु सिप्पी (५९, रा. रितु बंगला, ग्रीन पार्क, औंध) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची भोसरी औद्योगिक वसाहतीमध्ये सी. पी. पॉलीयुरेथिन्स प्रा. लि. ही कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे नुकसान व्हावे या उद्देशाने आरोपींनी इपॉक्सी फ्लोरिंग मटेरियलच्या ८ हजार ८२५ सेट्सची परस्पर विक्री केली. तसेच त्यांच्या कंपनीकडून व्ही. आर. एल ट्रॅव्हल्स कंपनीला भाड्यापोटी धनादेश दिले जातात. ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक रकमेचे धनादेश त्यांना देण्यात आले. जास्तीची रक्कम परस्पर स्वीकारून २0१0 ते २0१२ या दोन वर्षांत तब्बल १ कोटी ८९ लाख ७३ हजार ७५0 रुपयांची फसवणूक केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
No comments:
Post a Comment