Wednesday, 13 March 2013

‘एचए’ औषधे खरेदीस संमती

‘एचए’ औषधे खरेदीस संमती: पिंपरी । दि. १२ (प्रतिनिधी)

आर्थिक संकटात सापडलेल्या एचए कंपनीला सहकार्याचा हात म्हणून महापालिकेच्या रुग्णालयांसाठी सलाईन, सिफोग्रुप आणि अँन्टिबायोटिक्स अशी विविध सात प्रकारांतील औषधे खरेदी करण्यास महापालिकेने संमती दिली आहे. एचएच्या अधिकार्‍यांबरोबर झालेल्या बैठकीत आयुक्त श्रीकर परदेशी यांनी महापालिका एचएची औषधे घेण्यास तयार असल्याची ग्वाही दिली. एचएची औषधे महापालिकेच्या रुग्णालयांसाठी खरेदी करावीत, असा प्रस्ताव सद्गुरू कदम यांनी स्थायी समिती सभेत मांडला होता. त्याची दखल घेतल्यानंतर मंगळवारी एचए अधिकार्‍यांबरोबर आयुक्त व नगरसेवकांची बैठक झाली.

महापालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी आवश्यकतेनुसार थेट पद्धतीने सलाईन १, सिफोग्रुपची ४ आणि अँन्टिबायोटिक्स २ अशी सात औषधे महापालिका खरेदी करणार आहे. नॅशनल प्राईस प्रेफरन्स अथॉरिटी या संस्थेने निश्‍चित केलेल्या सरकारी औषधांच्या दरानुसार महापालिकेला औषधे दिली जाणार आहेत. थेट कंपनीकडून खरेदी केली जाणार असल्याने बाजारभावाच्या तुलनेत कमी किमतीत ती महापालिकेला मिळणार आहेत, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक के. व्ही. वर्की यांनी नमूद केले. आर्थिक संकटात सापडलेली कंपनी वाचविण्याच्या दृष्टीने महापालिकेने उचलले हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे सद्गुरू कदम यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment