साडेसात कोटी मिळकतकर थकीत: पिंपरी । दि. २९ (प्रतिनिधी)
शहरातील पाच लाखांहून अधिक रकमेचा मिळकतकर थकबाकीदारांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. बिल्डर, हॉटेल व्यावसायिक आणि शिक्षणसंस्था अशा एकूण २२ जणांकडे साडेसात कोटी थकबाकी आहे. तत्काळ थकबाकी भरावी अन्यथा जप्ती कारवाई केली जाईल, असा इशारा नोटिसीत दिला आहे.
नोटिस दिलेले सर्व थकबाकीदार १५ लाखांपुढील आहेत. के. एन टाईल्स यांच्याकडे १६ लाख ७१ हजार थकबाकी आहे. थकबाकीदारांच्या यादीतील ही सर्वांत कमी रक्कम आहे, तर ८५ लाख ६५ हजार रुपयांची सर्वाधिक थकबाकीची रक्कम जिल्हा शल्य चिकित्सालयाकडे आहे. पाच नामांकित शिक्षण संस्थांकडे १ कोटी ४३ लाख ९७ हजार ७४६ रुपयांची थकबाकी आहे. यासह हॉटेल, उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिकांकडे मोठय़ा रकमेची थकबाकी आहे.
No comments:
Post a Comment