नागरिक चिंतेत; अधिकारी धास्तावले: पिंपरी । दि. १३ (प्रतिनिधी)
काही काळ थंडावलेल्या अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईस पुन्हा गती आली असून नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. अनधिकृत बांधकाम नियंत्रणात हलगर्जीपणा दाखवल्यास कारवाई होणार असल्याने अधिकारी धास्तावले आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जून २0१२ अखेरपासून शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडू लागला आहे. महापालिकेने २८ जून २0१२ पासून २२५ बांधकामांवर कारवाई केली असून ८ लाख ८७ हजार ६७७ चौरस फुटांचे बांधकाम पाडले आहे. ८६१ मिळकतधारकांवर गुन्हे दाखल केले आहेत. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी तोडगा काढण्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिका सभेत संमत करून शासनाकडे पाठवला आहे. तो प्रलंबित आहे. ३१ मार्च २0१२ नंतरची अनधिकृत बांधकामे थांबवावीत.यापुढे अशी बांधकामे होणार नाहीत,याची दक्षता अधिकार्यांनी घ्यावी. नागरिकांनीही बांधकामे थांबवावीत, असे आवाहन करण्यात आले होते. असे असताना १ एप्रिल २0१२ नंतर २५७५ बांधकामे झाली आहेत. त्यातील १७३ बांधकामे विकास प्रकल्पांच्या आरक्षित जागेवरील आहेत.
No comments:
Post a Comment