Wednesday, 17 April 2013

"वायसीएम'मधील खरेदीची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

"वायसीएम'मधील खरेदीची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयासाठी (वायसीएम) 2001 पासून झालेली औषध व विविध वैद्यकीय उपकरणांची खरेदी, करण्यात आलेले विविध करार, तेथील सुरक्षा व्यवस्था आणि भरती प्रक्रियेची पुण्याच्या विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत घोषणा केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

No comments:

Post a Comment