कॅन्टोन्मेंटकडे वर्ग करा तळवडेतील बाधित भाग: तळवडे । दि. ११ (वार्ताहर)
तळवडे-चिखलीतील काही गटांवर रेडझोन शिक्के मारण्याची कार्यवाही झाली आहे. अशा क्षेत्रांसाठी महापालिकेकडून विकासासाठी तरतूद केली जाणार नाही. त्यामुळे हा भाग देहूरोड कॅन्टोन्मेंटमध्ये वर्ग करण्यात यावा. अशी संतप्त प्रतिक्रिया तळवडेतील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेकडून विकासच होणार नसेल तर यापुढे मिळकतकर भरू नये, असे आवाहन नगरसेवक दत्ता साने व स्वाती साने यांनी केले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयावरूनच देहूरोड दारूगोळा डेपोपासून दोन हजार यार्ड हद्दीतील क्षेत्र संरक्षित क्षेत्र (रेडझोन) जाहीर झाले. न्यायालयाच्या निर्देशानुसार बाधित क्षेत्रातील सर्व जमिनींच्या सातबारावर शिक्के मारण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून गाव कामगार तलाठय़ांना प्राप्त झाले आहेत. ही कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे.
No comments:
Post a Comment