Monday, 24 June 2013

लालटोपीनगरचे रहिवासी संभ्रमात

लालटोपीनगरचे रहिवासी संभ्रमात: पिंपरी : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) नियमावलीनुसार खासगी विकसकाच्या माध्यमातून मोरवाडी येथील लालटोपीनगर झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच ठिकाणी पुण्यातील गणेश कला-क्रीडा मंचच्या धर्तीवर प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे रहिवाशी संभ्रमित आहेत.

लालटोपीनगर झोपडपट्टी परिसरात ३ हजारांहून अधिक लोकवस्ती आहे. २0 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून वास्तव्यास असलेले नागरिक प्रकल्पामुळे बेघर होण्याच्या शक्यतेने भयभीत आहेत. मनपाने विविध झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनाचे प्रकल्प हाती घेतले. या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रकल्प राबविण्याचे नियोजन केले नाही. नियमावलीनुसार येथील झोपडीधारकांसाठी आहे त्याच ठिकाणी पुनर्वसनाचा गृहप्रकल्प उभारण्याचे नियोजन केले. असा प्रकल्प राबविण्यासाठी किमान ७0 टक्के रहिवाशांची संमती आवश्यक असते. संमती घेऊन कागदपत्र तयार करण्याचे काम सुरू आहे. विकसकाने एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीची नेमणूक करून तेथे स्वतंत्र संपर्क कार्यालय सुरू केले आहे. हे काम सुरू असताना महापालिकेने साडेआठ एकर जागेवर भव्य प्रकल्प राबविण्याची घोषणा केली. (प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment