विद्यार्थी, पालकांचे लक्ष निवडयादीकडे: निगडी : केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार ११ वीचे प्रवेशअर्ज स्वीकृतीची गुरुवारी मुदत संपल्याने विद्यार्थी व पालकांचे लक्ष आता निवड यादीकडे लागले आहे. आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळते का, याविषयी विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे.
१२ ते १९ मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये, तसेच मुख्य केंद्रासह १२ उपविक्री केंद्रांवर अर्जविक्री झाली. पिंपरी, भोसरी विभागात पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय, भोसरीतील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिंचवड, निगडी विभागात आकुर्डीतील म्हाळसाकांत विद्यालय, तर चिंचवडमधील ताराबाई मुथा हायस्कूलचा समावेश होतो.
No comments:
Post a Comment