विशेष कार्यकारी अधिकारी घाबरले: पिंपरी : जिल्हाधिकार्यांमार्फत नेमणूक करण्यात येणार्या विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी १२ वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता आवश्यक असल्याचा अध्यादेश राज्य शासनाने नुकताच काढला आहे. नव्याने या पदावर नेमणूक करताना १२ वी उत्तीर्ण ही अर्हता ग्राह्य धरली जाणार आहे. या अध्यादेशामुळे सद्य:स्थितीत या पदावर काम करणार्या शहरातील ५0 टक्क्यांहून अधिक कार्यकर्त्यांना हे पद सोडावे लागणार आहे.
दस्तऐवजांचे साक्षांकन करण्याचा अधिकार असलेले हे पद पालकमंत्र्यांच्या शिफारशींच्या आधारे नेत्यांच्या, नगरसेवकांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना दिले जाते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील सुमारे ६00 हून अधिक कार्यकर्त्यांना हे पद देण्यात आले आहे. शासनाच्या २८ फेब्रुवारी २00९ च्या अध्यादेशाने ज्यांची पाच वर्षासाठी या पदावर नेमणूक झाली होती. तो कालावधी आता संपुष्टात आला आहे.
No comments:
Post a Comment