चिंचवडमध्ये पाऊस; पुण्यात हुलकावणी: चिंचवड : सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह चिंचवड परिसरात आज पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद अनेकांनी घेतला.
पुण्यात आज दिवसभर ढगाळ हवामान होते. मात्र पावसाने हुलकावणी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये सकाळपासूनच हवेत उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाचला ढग भरून आले. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढत गेल्याने रस्त्यावरील पथारीवाले, भाजीविक्रेते व इतर व्यावसायिकांची धांदल उडाली. (प्रतिनिधी)
No comments:
Post a Comment