विरोधी पक्षनेते कैलास कदम इटलीच्या दौर्यावर: पिंपरी : महापालिकेतील विरोधी पक्षनेते व इंटक पुणे शहर जिल्हाध्यक्ष कैलास कदम आज १५ दिवसांच्या इटली (तुरिन) दौर्यावर रवाना झाले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर जगभरातील कामगार संघटनांचे प्रतिनिधित्व करणार्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या शिखर संस्थेच्या वतीने आयटीसी अंतर्गत तुरीन येथे दि. १ ते १३ जुलै या कालावधीत जगातील निवडक कामगार संघटना प्रतिनिधींचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. भारतातून एकमेव प्रतिनिधी म्हणून कदम यांची निवड केली आहे. शिबिरासाठी पालिकेच्या पदाधिकार्याची प्रथमच निवड झाली आहे.
No comments:
Post a Comment