भोसरीत नाल्यातील सिमेंट काँक्रीटचे बांधकाम फोडून दूरध्वनी सेवा देणा-या बीएसएनएल कंपनीची हजारो रुपयांची केबल चोरट्यांनी चोरून नेली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 17) दुपारी एकच्या सुमारास लांडेवाडीतील टेल्को रस्त्यालगत घडला. या चोरीमुळे या भागातील दूरध्वनी सेवा खंडीत झाली आहे.
No comments:
Post a Comment