Saturday, 10 August 2013

नमाज पठण, गळाभेट; जल्लोषात ईद साजरी

मुबारक हो : चिखलीत गढीत शुभेच्छांचा वर्षाव

पिंपरी : रमजान ईद पिंपरी-चिंचवड शहरात मोठय़ा जल्लोषात साजरी झाली. शहरातील ईदगाह मैदानांवर मोठय़ा जल्लोषात नमाज पठण करण्यात आले. शिरकुर्माचा आस्वाद शहरवासीयांनी घेतला. एकमेकांना शुभेच्छा देत हा सण साजरा झाला. 
मस्जिदऐवजी चिखलीगावातील ऐतिहासिक राजवाड्यामध्ये नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी आज पारंपरिक पद्धतीने ईदचा सण साजरा करीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवून आणले.
ईद मुबारक अशा शब्दांत शुभेच्छा देऊन एकमेकांना आलिंगन देत मोठय़ा उत्साहात ईदचा सण साजरा केला. या वेळी मौलाना अबरार अहमद अंसारी यांनी नमाज पठण केले. या वेळी राजवाड्याचे विश्‍वस्त अमोल थोरात, शाही मस्जिदचे अध्यक्ष फिरोज शेख, उपाध्यक्ष इसाक सेख, सल्लागार गुलाब तांबोळी, सदस्य अमजद शेख, जावेद शेख, सरदार सय्यद, कासम सय्यद आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार फिरोज शेख यांनी मानले.
पिपंरी चिंचवड शहर मुस्लिम महासंघाचे अध्यक्ष अजहर खान, युसुफ कुरेशी, दस्तगीर मणीयार, मुन्ना शेख, शबीर शेख, जुनेद मोमीन, फारूख कुरेशी यांनी बांधवांना शुभेच्छा दिल्या. तर भोसरी येथे मुरादअली शेख, करीम सैय्यद, राजू मुलाणी, फिरोज शेख, वजीर थोरपे, अस्लम पठाण, शब्बीर शेख, रौफ सैय्यद, इमरान मुजावर, फिरोज खान, नुरहक्क शेख, तनवीर शेख यांनी बांधवांना शुभेच्छा दिल्या. नेहरूनगर येथे पिंपरी चिंचवड मुस्लिम वेल्फेअर अँण्ड कब्रस्तान इदगाह कमिटीचे ए.बी. शेख, फारुक नदीर अली इनामदार, जिलाणी मुलाणी, नादीर शेख, कादर शेख, जिलाणी शेख, नजिरभाई तराजू आदींनी बांधवांना शुभेच्छा दिल्या. चिखली येथे शाही मस्जिदचे अध्यक्ष फिरोज शेख, इसाक शेख, कासम सय्यद, सरदार सय्यद, गुलाब तांबोळी, अमजद शेख आदींनी बांधवांनी शुभेच्छा दिल्या. 
विश्रांतवाडी परिसरात ईद उत्साहात साजरा करण्यात आला. येरवड्यात शाहदावलबाबा दर्गा व जयजवान नगर मधील मैदानावर मुस्लीम बांधवानी सामुदायिक नमाज पठण केले. विश्रांतवाडीत एकतानगर मधील अलफताह यंग सर्कलयांच्या वतीने सार्वजनिकरित्या शिरखुर्मा वाटप करुन ईद साजरी करण्यात आली. यावेळी अशपाक शेख, इमरान शेख, अशपाक मुजावर, जिशान शेख, आशिष साबळे, राहुल प्रताप उपस्थित होते. विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या वतीने मौलाना व मशिदीमध्ये नमाजासाठी येणार्‍या बांधवाना देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. (प्रतिनिधी)

- नेहरूनगर : गुरुवारी सायंकाळी चंद्र दिसल्यानंतर शुक्रवारी रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय सर्व मस्जिदच्या पदाधिकार्‍यांनी घेतला. गुरुवारी सायंकाळी शेवटचा रोजा ठेवून बांधवांनी अल्लाहची उपासना केली. नेहरूनगर येथील तवकल्ला जामा मस्जिद, ईदगाह मैदानावर शुक्रवारी सकाळी ईद उल फित्रची नमाज पठण करण्यासाठी मोठी गर्दी झाली. मुफ्ती साहब गुलाम मुस्तफा यांनी नमाज पठण केले. दिवसभर घरोघरी शीरकुम्र्याचा दरवळ होता. शहरातील दूध केंद्रांवर दूध खरेदीकरिता मोठी गर्दी होती.

No comments:

Post a Comment