पिंपरी-चिंचवड महापालिकेत 17 वर्षांपूर्वी समावेश होवूनही दुजाभावाच्या वागणुकीमुळे नशिबी वनवास आलेल्या च-होलीकरांनी भाजपच्या नेतृत्वाखाली आज शहर अभियंत्यांना सुमारे तीन तास घेराव घातला. नागरी सुविधा तातडीने पुरविण्याचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

No comments:
Post a Comment