पिंपरी : सध्याच्या मंदीच्या काळात उद्योग व्यवसाय व्यापार क्षेत्रात निराशाजन्य वातावरण आहे. रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे उद्योग मोठय़ा अडचणीत आले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे या क्षेत्राला फार मोठय़ा मंदीला तोंड द्यावे लागत आहे. मोठय़ा कंपन्यांनी मोठय़ा कालावधीचे ब्लॉक क्लोजर घोषित केल्यामुळे कामगार क्षेत्रावरही फार मोठा अनिष्ट परिणाम झालेला आहे. महागाईने सामान्य माणूस होरपळून निघालेला आहे. अशा अवस्थेत सरकारने उद्योग व्यवसाय व्यापाराला काहीतरी पॅकेज जाहीर करणे अपेक्षीत आहे, अशी मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment