पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राज्य सरकारकडे "शब्द' टाकणार आहेत. तसे आश्वासन त्यांनी सोमवारी त्यांना एका शिष्टमंडळाला दिले आहे. शहर मनसेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने केली. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनीही शहरभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, आयुक्त डॉ. परदेशी हे आजपासून पाच दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाचगणीला रवाना झाले.
No comments:
Post a Comment