पिंपरी - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वच स्तरांमधून आवाज सुरू झाला आहे. शहरातील रोटरी व लायन्स क्लबच्या सभासदांनीही मोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. विविध जाती-धर्मांच्या संस्था, संघटना आणि मान्यवर पुढे सरसावले आहेत. सजग नागरी मंचने सलग दुसऱ्या दिवशी राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेला प्राधिकरणातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. मुस्लिम यंग सर्कलच्या महिलांनी डीलक्स चौकात स्वाक्षरी मोहीम घेऊन आयुक्तांना पाठिंबा दिला.
No comments:
Post a Comment