लोकप्रिय निर्णयांमुळे एखादी राजकीय व्यक्ती जनतेच्या गळ्यातील ताईत होते. मात्र, प्रशासनातील अधिकाऱ्यांबाबत असे सुख फारच दुर्मिळ असते. पिंपरी-चिंचवडकर सध्या हाच अनुभव घेत आहेत. काही राजकीय मंडळींनी आपले हितसंबंध दुखावल्याने महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना बदलण्याचा घाट घातला आहे. त्यांना हटविण्यासाठी मोजक्याच नगरसेवक, ठेकेदार व दलालांनी देव पाण्यात ठेवले आहेत. "राजकारणातून पैसा अन् पैशातून राजकारण' या प्रचलित समीकरणालाच आपल्या कामकाजातून आयुक्तांनी सुरुंग लावला. त्यामुळे जनता आयुक्तांवर जाम खूष आहे. या आयुक्तांना त्यांचा कार्यकाल पूर्ण करू द्यावा, या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. आयुक्तांसाठी कधी नव्हे त्या सामान्य जनतेनेच रणशिंग फुंकले. विरोधी पक्षांनीसुद्धा थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.
No comments:
Post a Comment