Saturday, 15 February 2014

पर्यावरण मंडळाचे उद्घाटन


पिंपरी : लांडेवाडी, भोसरी येथील कला महाविद्यालयात पर्यावरण मंडळाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, संस्थेचे विश्‍वस्त मारुती वाघमोडे, प्राचार्य डॉ. डी. डी. रणनवरे आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. रणनवरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पठाण यांनी व्याख्यानात खेडेगावापासून जपानपर्यंत पर्यावरणाच्या बदलाची विविध उदाहरणे दिली. पाण्याचा चांगला वापर करावा. नद्या स्वच्छतेच्या मोहिमा राबवाव्यात. पुढील ७0 वर्षांनंतर पाणी रेशनिंगवर विकत मिळेल. महाविद्यालयीन युवकांनी एकत्र येऊन पर्यावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करावा. प्रदूषण थांबविण्यासाठी भोसरी व सभोवतालच्या प्रदेशामध्ये जाऊन कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. म्हणून पर्यावरण वाचवा हा संदेश डॉ. पठाण यांनी दिला. जैवतंत्रविज्ञान विभागप्रमुख प्रा. एस. एन. चव्हाण यांनी परिचय करून दिला. प्रा. विनोद मैंद यांनी सूत्रसंचालन केले. 

No comments:

Post a Comment