आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात 80 हजार नव्या मतदारांची नोंद झाली आहे. त्यामुळे मतदारांची संख्या 11 लाखांवर पोहचली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. वयाची 18 वर्षे पूर्ण होणा-या प्रत्येक पात्र नागरिकास मतदार यादीत आपले नाव नोंदविता यावे, मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती करता यावी, पत्ता बदलला असल्यास नवीन पत्त्याची नोंद करता यावी आणि दुबार नाव असल्यास किंवा निधन झाले असल्यास त्यांचे मतदार यादीतून नाव वगळता यावे, यासाठी हे अभियान राबविण्यात आले.
No comments:
Post a Comment