माजी महापौर आझम पानसरे काँग्रेसमध्ये गेले आहेत. नेत्यांच्या विचित्र खेळीमुळे कार्यकर्ते नाराज आहेत. खालापूर, पनवेलला स्वत:ची व्होट बँक व आमदार असतानाही शेकाप आयात उमेदवारास पाठिंबा देत आहे. त्यामुळे त्यांच्याही कार्यकर्त्यांत गोंधळ आहे. सत्तेसाठी आरपीआयने जातीयवाद्यांशी दोस्ती केल्याचा आरोपही होत आहे. निष्ठावंतांना डावलून पैसे घेऊन उमेदवारी दिली जाते, असा आरोप विद्यमान खासदाराने स्वपक्षीयांवर केला आहे, तर जगतापांना पाठिंबा दिला, तर ते काय पक्षात कायम राहणार का, असा प्रश्न शेकापच्या निष्ठावानांना सतावत आहे. कामशेत : आगामी लोकसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांसह पक्षनेते अन् कार्यकर्त्यांनीही पक्षाची अदलाबदली सुरू केल्यामुळे पक्षतत्त्व अन् पक्षनिष्ठेला हरताळ फासला जात आहे. मात्र यामुळे पक्षातील जुने- जाणते, निष्ठावान कार्यकर्ते नाराज होत आहेत.
No comments:
Post a Comment