Wednesday, 26 March 2014

महापालिका पडली चार तास बंद

पिंपरी : उमेदवारी अर्ज सादर करतेवळी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन झाले. सुरक्षा व्यवस्था कोलमडली. वाहतूक कोंडी झाली. महापालिका तळमजला ते चौथ्या मजल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांच्या कक्षापर्यंत कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. पोलिसांना उमेदवाराविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करणे भाग पडले, अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी पोलिसांनी दुसर्‍या दिवशी मंगळवारी कडक धोरण अवलंबले. ओळखपत्र लावलेल्या कर्मचार्‍यांनासुद्धा महापालिका इमारतीत प्रवेशास मज्जाव केला. ‘‘आम्ही महापालिका आयुक्तांचे नाही, तर फक्त निवडणूक आयोगाचे आदेश पाळतो,’’ अशी कठोर भूमिका घेऊन अनेक कर्मचार्‍यांना दुपारी ३ वाजेपर्यंत बाहेर तिष्ठत ठेवले.

No comments:

Post a Comment