पिंपरी : जिल्ह्यात ५ मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आणि पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या हद्दीत असणारे राजकीय पक्षांचे, सदस्यांच्या नावाचे फलक, विकासकामाच्या उद्घाटनाचे फलक झळकत आहेत. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे पालन होत नसल्याची तक्रार जागरूक नागरिकांनी ‘लोकमत’कडे केली आहे.
बोर्डाच्या हद्दीत बोर्डाचे उपाध्यक्ष व काही सदस्यांच्या नावाचे फलक त्यांच्या निवासस्थानानजीक अद्यापही झळकत आहेत. तसेच एका सदस्याने वार्डात केलेल्या विकासकामाच्या नावाचा उद्घाटनाचा फलक त्याच्या नावासह झळकत आहे. तसेच काही संघटनांच्या नामफलकावर मंत्र्यांची नावे आहेत. महापालिका हद्दीत मामुर्डी, साईनगर येथे एका राजकीय पक्षाच्या नावाचा फलक आहे. चिंचवड येथे एका नगरसेवकाच्या उपक्रमाचा फलक त्याच्या नावासह झळकत आहे.

No comments:
Post a Comment