पिंपरी : रिक्षा, बसमधील प्रवाशांशी संवाद साधत साधत महापालिका भवनापर्यंत येऊन अगदी साध्या पद्धतीने आम आदमी पक्षाचे उमेदवार मारुती भापकर यांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला.
मोहननगर येथील निवासस्थानापासून सकाळी दहाच्या सुमारास भापकर रिक्षाने चिंचवड स्टेशनला आले. तेथून पीएमपीएल बसमध्ये बसून पिंपरीकडे निघाले. बसमध्ये त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. साडेअकराच्या सुमारास महापालिकेसमोर उतरले. तेथून २५ ते ३0 कार्यकर्त्यांसह चालत प्रवेशद्वारावर आले. कार्यकर्त्यांच्या डोक्यावर ‘मैं आम आदमी हूँ’ लिहिलेल्या गांधी टोप्या दिसत होत्या. निवडक पाच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये नागरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, दिलीप पवार, प्रशांत खाडे, श्रीमंत बोरसे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment