पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील जिव्हाळ्याच्या अनधिकृत बांधकाम नियमितीकरण प्रश्नावरून मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. काल शिवसेनेच्या मेळाव्यात नदीपात्रातील स्वत:ची शाळा वाचविण्यासाठी शहरातील ६६ हजार अनधिकृत बांधकामांचा बळी द्यायला निघालेल्या लक्ष्मण जगताप यांना धडा शिकवावा, असे आवाहन उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून शेकाप-मनसेचे उमेदवार जगताप यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ‘एकीकडे अनधिकृत बांधकामे नियमित करण्याविषयी मोर्चा काढून दुसरीकडे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी प्रोत्साहन देऊन दुटप्पी भूमिका बारणे घेत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुर झाली आहे. उमेदवारांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि शेकापचे उमेदवार यांच्यात जुंपली आहे.
No comments:
Post a Comment