पिंपरी : चिंचवड आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार घरफोडीच्या घटना घडल्या. यामध्ये ४ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
चिंचवड एमआयडीसीतील मयूरी को- ऑपरेटिव्ह सोसायटीतील सत्यगीत सीताराम उमरजिकर (वय ४४) हे कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान, दरवाजाचा कडीकोयंडा व कपाटातील तिजोरी उचकटून त्यामधील १ लाख ७८ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. तसेच उमरजिकर यांच्या शेजारीच राहणारे सदानंद प्रकाश बोरसे यांच्या घराचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी १ लाख १५ हजार ८00 रुपये किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केले. या दोन्ही घटना गुरुवारी सकाळी ९ते पाचच्या दरम्यान घडल्या. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment