Sunday, 13 April 2014

मतदानासाठी क्षेत्रीय अधिकारी सज्ज

मावळ लोकसभा मतदार संघासाठी येत्या 17 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यासाठी क्षेत्रीय अधिका-यांना आज (शनिवारी) प्रशिक्षण देण्यात आले.
मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या क्षेञीय अधिका-यांकरीता चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे हा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे, समन्वय अधिकारी प्रशांत खांडकेकर, अजित रेळेकर, यांनी निवडणूक कामकाजा संदर्भात महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना देऊन क्षेञीय अधिका-यांना कामकाजात उद्‌भवणा-या अडचणींचे निराकरणाबाबतही माहिती दिली. तसेच या प्रशिक्षण वर्गास संगणक अधिकारी नीळकंठ पोमण हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment