क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या 115 व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी (दि. 18) चिंचवड येथे अभिवादन फेरी काढण्यात आली. या अभिवादन फेरीमध्ये विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
चापेकर बंधूंच्या अभिवादन फेरीची सुरूवात क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिरापासून करण्यात आली तर फेरीचा समारोप क्रांतीवीर चापेकर वाडा येथे झाला. अभिवादन फेरीमध्ये क्रांतिवीर चापेकर बंधुंची वेशभूषा केलेली मुले उभी करण्यात आली होती. प्रामुख्याने क्रांतिवीर बाळकृष्ण चोपेकर बालक मंदीर, क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिर, क्रांतिवीर चापेकर विद्यालय, खिंवसरा पाटील विद्या मंदिर, लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, पुनरूत्थान समरसता गुरूकुलम्, स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय, राजर्षी शाहू महाराज अभ्यासिका आदी शाळांनी सहभाग घेतला होता
No comments:
Post a Comment