पिंपरी : क्रीडा भारती, पिंपरी-चिंचवड शहर आणि ज्ञान प्रबोधिनी विद्यालय क्रीडाकुलतर्फे आयोजित जोर मारणे स्पर्धेत दहावीतील विद्यार्थी सौरभ मगरने १५00, तर ऐश्वर्या शिंदेने ३३१ जोर मारून अनुक्रमे मुले व मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.
हनुमान जयंतीनिमित्त निगडीतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या मैदानावर जोर मारणे, तसेच, मल्लखांब आड्या मारण्याची स्पर्धा झाली. स्पर्धेत सहावी ते दहावीच्या २00 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन व मारुती स्तोत्राने स्पर्धेस सुरुवात झाली. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एकूण २५ हजार जोर मारले. केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर व क्रीडाकुलप्रमुख भगवान सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.

No comments:
Post a Comment