शासकीय यंत्रणांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही अशी ओरड नेहमी ऐकायला मिळते. परंतु पीएमपीएमएलने प्रवाशांच्या तक्रारनिवारणासाठी एक वेगळे पाऊल उचलून आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.
मात्र, दंड करण्यापेक्षा पीएमपीएमएलच्या संबंधित अधिका-यांनी एक वेगळी शक्कल लढवली. त्यांनी संबंधित बस चालकाला दोन दिवस यमुना नगर बस स्टॉपवर उभे करून येणारी बस थांबविण्याचे काम सोपविले. प्रवासी तासन्तास बस स्टॉपवर थांबतात. त्यांच्या डोळ्यासमोरुन एखादी बस न थांबता निघून जाते त्यावेळी त्यांना किती त्रास होतो, याची जाणीव त्या चालकाला व्हावी. त्याच्याकडून अशा प्रकारची चूक पुन्हा होऊ नये आणि प्रवाशांना चांगली सेवा मिळावी. असा त्या मागील त्यांचा हेतू होता.
No comments:
Post a Comment