लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली असून पिंपरी-चिंचवड शहरात बड्या नेत्यांमध्ये वाक्युध्द रंगणार आहे. रोड शो, सभांनी प्रचारांची रंगत अधिकच वाढणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला अवघे अकरा दिवस उरले आहेत. प्रचारासाठी जेमतेम आठवडाभराचा कालावधी उरला आहे. त्यामुळे मावळ मतदार संघात प्रचाराचा ज्वर चांगलाच तापला आहे. कालावधी कमी उरल्याने अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागत आहे. उमेदवार तसेच त्यांचे कुटुंबीय जोर लावून प्रचार करीत आहेत. शहरातील चौक उमेदवारांच्या फ्लेक्सने भरले आहेत.
No comments:
Post a Comment