Saturday, 10 May 2014

जागा ताब्यात नसताना निविदा काढल्याने 'एम्पायर'चा उड्डाणपूल रखडला

महापालिका प्रशासनाची धक्कादायक कबुली
मुदत संपुनही चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेट वसाहतीजवळील उड्डाणपुलाचे काम अवघे 30 टक्केच झाल्याने स्थायी समिती सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद शेट्टी यांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. उड्डाणपुलाच्या कामासाठी शंभर टक्के जागा ताब्यात नसताना निविदा काढल्याने हा उड्डाणपूल रखडल्याची धक्कादायक कबुली कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली. विशेष म्हणजे कामाची मुदत संपल्यानंतर जागेचा ताबा मिळाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिल्याने आयुक्त राजीव जाधव यांच्यासह स्थायी समिती सदस्य आचंबित झाले.

No comments:

Post a Comment