Tuesday, 10 March 2015

PMP च्या सर्व बस ६ महिन्यांत मार्गावर

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अत्यंत खिळखिळ्या स्वरूपात असलेल्या सुमारे दोनशेहून अधिक बसची संपूर्ण डागडुजी करण्यात येणार असून, पुढील सहा महिन्यांमध्ये या सर्व बस मार्गावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पीएमपीच्या ताफ्यातील रंग उडालेल्या बसवर पुन्हा नव्याने रंगरगोटी केली जात असून, हे कामही पुढील दहा दिवसांत पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. 

No comments:

Post a Comment