पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने अस्तित्व हरवलेल्या काँग्रेसच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता ‘काँग्रेस बचाव’ची घोषणा करत शहराध्यक्ष सचिन साठे यांना हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. निवडणुकीत एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही, याची जबाबदारी स्वीकारून साठे यांनी पदाचा दिलेला राजीनामा त्वरित मंजूर करून निष्ठावान कार्यकर्त्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment