पिंपरी : 'राष्ट्रवादी'च्या मावळत्या महापौर शकुंतला धराडे यांनी सुरू केलेल्या व अद्याप अपूर्ण असलेल्या विविध योजना मंगळवारी (ता.14) बिनविरोध निवड झालेले भाजपचे पहिले महापौर नितीन काळजे हे पूर्णत्वास नेणार आहेत. गेली कित्येक वर्षे प्रलंबित राहिलेले आणि संपूर्ण शहराला भेडसावणारे रेडझोन, शास्ती कर आणि अनधिकृत बांधकामे या ज्वलंत आणि गंभीर प्रश्नांचाही ते पाठपुरावा करणार आहेत. तसेच शहराला जिल्ह्याचा दर्जा आणि स्वतंत्र पोलिस आयुक्तालय करण्याला त्यांचा प्राधान्यक्रम राहणार आहे.अनावश्यक कामे आणि पर्यायाने त्यावर होणारा वायफळ खर्च टाळणार असल्याचे सांगताना नियमाला हरताळ फासून शहरात उभारण्यात आलेले व अपघाताला आमंत्रण देणारे गतिरोधक नगरसेवकाच्या सांगण्यानुसार कुठेही आणि कसेही आता उभारले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment