वाहतूक पोलिसांनी बुधवारी (ता. २९) पिंपरी-चिंचवड शहरात मोठी कारवाई केली. पिंपळे सौदागर परिसरातील बेशिस्त अशा २४७ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली. ४९ हजार दंड वसूल केला. दहा अधिकारी आणि ३६ कर्मचाऱ्यांनी मिळून ही ठोस कारवाई केली. शहराच्या विविध भागांत अशा तक्रारी येत असतात, तिथेही अशीच कारवाई करणार असल्याचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांनी जाहीर केले. वाहतूक विभाग प्रथमच इतकी धडक कारवाई करताना जनतेने पाहिला. विशेष म्हणजे दुजाभाव न करता अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या वाहनावरदेखील नियम मोडला म्हणून कारवाई केली. त्यामुळेच या कामाचे कौतुक आहे. पोलिसांचा हाच खाक्या कायम राहिला तर लोक नियम मोडण्याचे धाडस करणार नाहीत. या चांगल्या कामासाठी वाहतूक पोलिसांना शुभेच्छा! पण...
No comments:
Post a Comment