Saturday, 29 April 2017

रोहित्रांना सुरक्षा आवरण बसविण्याचे काम नियमानुसारच

पिंपरी – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धोकादायक रोहित्रांना लोखंडी पत्र्यांचे सुरक्षा आवरण बसविण्याचे काम हे नियमानुसारच करण्यात आले आहे. असा दावा महावितरण प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे. या कामासाठी लोखंडी पत्र्यांचा पुरवठा करणे व संबंधित रोहित्रांना लोखंडी पत्रे बसवून देण्याच्या कामासाठी डिसेंबर 2015 मध्ये नियमानुसार व खुल्या पद्धतीने ई-निविदा प्रक्रिया करण्यात आली. याबाबत रितसर सहा वृत्तपत्रांमध्ये ई-निविदाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली व ई-निविदा मागविण्यात आल्या. त्यात तीन ई-निविदा प्राप्त होऊन कमी दराच्या निविदेनूसार उल्हासनगर येथील एका कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 469 पैकी 463 धोकादायक रोहित्रांना सुरक्षा आवरण बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे, तसेच चिंचवड येथील रोहित्राचा स्फोट झाल्याच्या घटनेपुर्वीपासूनच धोकादायक रोहित्रांना लोखंडी पत्र्यांचे सुरक्षा आवरण लावण्यात येत आहे, अशी माहिती महावितरण प्रशासनाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे

No comments:

Post a Comment