पिंपरी - खासगी प्राथमिक शाळांशी स्पर्धा करत महापालिका प्राथमिक शाळाही मार्केटिंगमध्ये उतरल्या आहेत. घटत्या पटसंख्येवर उपाय म्हणून कृतीयुक्त अध्ययनाबरोबरच महापालिका शाळांमधूनही खासगीच्या तोडीस तोड सेमी इंग्रजी, संगणक शिक्षण, ग्रंथालय व शाळांमधील विविध उपक्रमांचे फ्लेक्सच्या माध्यमातून मार्केटिंग केले जात आहे. उपनगराच्या मुख्य चौकांच्या दर्शनी भागात शाळांचे फ्लेक्स लावून स्थानिक नगरसेवकांनी मार्केटिंग करण्याचे सकारात्मक पाऊल उचलले आहे.

No comments:
Post a Comment